सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही याचा विडाच उचलला आहे.. त्यासाठी ते राज्यातील सर्वात जास्त निधी इंदापुरच्या विकासासाठी आणत आहेत. भरणे यांच्या हस्ते दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सध्या चालू आहे. गिरवी व काटी गावच्या भागात रस्ते, नदीवरील पूल व विविध विकास कामांसाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या कामांची भूमिपूजने व उद्घाटने उद्या रविवारी ( दि.२७ ) होत आहेत.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमांच्या सभांमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आक्रमक भूमिका घेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची यांच्यावर प्रखर टीका करण्याची चिन्हे आहेत. भरणे सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
उद्या ( रविवारी ) गिरवी येथील ५ कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम होईल, व राज्यमंत्री भरणे यांची सभा दुपारी एक वाजता होईल. त्यानंतर काटी येथील काटी- रेडा- रेडणी रस्ता ( ३ कोटींचा निधी ), वरकुटे- काटी- नीरा भीमा कारखाना (६.११ कोटी रुपयांचा निधी ) तसेच काटी येथील ओढ्यावरील पुल ( १ कोटींचा निधी ) व इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी सात वाजता काटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अभिजीत तांबिले, माजी सभापती प्रशांत पाटील, सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर आदींसह काटी, गिरवी या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.