सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
दुचाकी गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अत्यंत वेगाने धावत जाणाऱ्या दुचाकीस रियाज मुलाणी या युवकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन ज्येष्ठांचे प्राण वाचले. आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणी या युवकाचा सत्कार करत त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक तर केलेच पण त्याने केलेल्या धाडसाबद्दल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली..

लासुर्णे (ता.इंदापूर) येथे काल ब्रेक फेल झाल्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यांची दुचाकी गाडी बंद करता येत नव्हती, परंतु रियाज याने धाडसाने ही गाडी पकडून ठेवली आणि थांबवली त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचू शकले. रियाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रियाजने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करत त्याचा सन्मान केला.