मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ एक आमदार एकच पेन्शन ‘ या घोषणेव्दारे आमदार कितीही वेळा निवडून आले तरी त्यांना जास्तीत जास्त एकाच वेळचे निवृत्तीवेतन दिले जाईल असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले आहे.
सध्याच्या स्थितीत आमदारांना त्यांच्या प्रत्येक पाच वर्षाच्या टर्मचे स्वतंत्र निवृत्तीवेतन मिळते. जर एखादा आमदार पाच वेळा आमदार झाला असेल तर त्याला पाच टर्मचे मिळून पाचपट निवृत्तीवेतन मिळते. पंजाबमध्ये प्रत्येक माजी आमदाराला एका आमदारकीच्या टर्मसाठी ७५००० रुपये निवृत्तीवेतन दिले जाते.
काही आमदारांना सध्या ३.५ लाख, काहींना ४.५ लाख तर काहींना ५.२५ लाख रुपये पेन्शन मिळते आहेत. काही जण तर आमदार आणि खासदार झाले आहेत, ते राज्य आणि केंद्र दोघांचे निवृत्तीवेतन घेत आहे. जनतेची सेवा करण्याचे वचन देऊन निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी
प्रत्यक्षात मात्र लाखो रुपये निवृत्तीवेतन घेत आहेत.
पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्येही या विषयाची चर्चा झाली होती, पण त्यावर काही निर्णय होऊ शकला नाही. आता भगवंत मान यांनी मात्र त्यांच्या पहिल्या काही निर्णयात आमदारांच्या पेन्शनबाबतच्या निर्णयाचा समावेश केला आहे.