बारामती : महान्यूज लाईव्ह
देशातील विविध मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विविध राजकीय पक्षांचे खासदार उद्यापासून बारामतीच्या दौर्यावर आहेत. उद्या सकाळी 11 वाजता बारामती विमानतळावर त्यांचे आगमन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा होत होती. बारामतीतील विविध विकासकामे, बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार पाहणी करणार आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योग अशा सर्व स्तरातील पाहणी खासदार करणार असल्याचे समजते.
यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसून या आमदारांच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून या दौऱ्यास सुरुवात होणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आमंत्रणावरून हे खासदार या ठिकाणी येत असल्याचे समजते.