बारामती : महान्यूज लाईव्ह
भिगवण येथील दीड वर्षाच्या चिमुकल्या आरुष याने अनावधानाने सहजपणे चाव्यांचा जुडगा तोंडात घातला आणि तो गिळला गेला. चाव्यांचा जुडगा पोटात गेल्याने आरुष अत्यवस्थ झाला. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी थेट बारामती गाठले. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव असलेल्या मुथा हॉस्पिटलमधील देवतांनी या बाळाला जीवदान दिले.

बारामतीतील डॉक्टर सौरभ मुथा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रोंकॉस्कॉपी तंत्राने शस्त्रक्रिया करून श्वासनलिकेच्या श्वासनलिकेच्या दरम्यान अडकलेला हा चाव्यांचा जुडगा यशस्वीरीत्या बाहेर काढला. भिगवण येथील आरुष अतुल गुणवरे या दीड वर्षाच्या बालकाने चाव्यांचा जुडगा गिळल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. भिगवण येथील डॉ. त्रिंबक मोरे, डॉ. गाढवे यांनी त्याला प्राथमिक दृष्ट्या तपासल्यानंतर परिस्थिती लक्षात आली त्यामुळे त्यांनी तातडीने डॉक्टर्स व त्यांच्याशी संपर्क साधला व बारामती येथे त्यास तातडीने पाठवले.
चाव्यांचा जुडगा गिळल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या आरुषला बारामतीत आणण्यात आले. तेव्हा त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. तोपर्यंत डॉक्टर राजेंद्र मुथा, डॉक्टर सौरभ मुथा, बारामतीतील कान नाक घसा तज्ञ डॉक्टर वैभव मदने व भूलतज्ञ डॉक्टर अमरसिंह पवार यांनी तातडीने सर्व प्रकारची उपचाराची व शास्त्रज्ञाची व्यवस्था केली होती. आरुषला दवाखान्यात आणताच त्याच्यावर थेट उपचारांना सुरुवात केली. आरूषने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरील बाजुस अडकल्याचे दिसल्यावर ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत चाव्यांचा जुडगा काढण्यात आला.