मुंबई : महान्यूज लाईव्ह
अवघ्या तीन वर्षाचा मुलगा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ग्रिलमधून खाली पडला. तो थेट रस्त्यावर पडूनही त्याला काहीसुद्धा झाले नाही. ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ या म्हणीची आठवण या घटनेमुळे सर्वांना झाली.
नाशिकमधील ओझर येथील ही घटना आहे. येथील अलसना या इमारतीत शेख कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते. त्यांचा तीन वर्षाचा मुलगा फैजान हा दु. १२.३० वा. घराच्या बाल्कनीत खेळत होता. खेळत असताना तो बाल्कनीच्या ग्रीलमधून खाली डोकावला. तोल गेल्याने तो थेट खाली चांदणी चौकाच्या रस्त्यावरच पडला.
त्याला पडलेला पाहताच आजुबाजुच्या लोकांनी धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचीवरून पडूनही फैजानला काहीच दुखापत झाली नाही, यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले.