मुंबई : महान्यूज लाईव्ह
कासव हा प्राणी दिर्घायुषी मानला जातो, तसेच तो खुप मोठ्या अंतराचा प्रवास करतो असे मानले जाते. परंतू आता याचा समुद्री कासवांच्या जगण्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात येते आहे.

अशाच एका टॅंगिग केलेल्या कासवाने सध्या रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास केला असून सध्या या कासवाचा मुक्काम मुंबईजवळच्या समुद्रात आहे.
वेळासच्या किनाऱ्यावर असंख्य समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. तेथील पर्यावरण रक्षकांकडून त्यांना संरक्षण दिले जाते. आता तेथेच काही कासवांना सॅटेलाईट टॅगिंग केले जात आहे. त्यामुळे ही कासवे किती व कुठे प्रवास करतात, याची माहिती मिळू शकेल. यावेळेस चार कासवांच्या प्रवासाची माहिती या टॅंगिगव्दारे मिळालेली आहे. जानेवारी महिन्यात या कासवांचे टॅंगिग करण्यात आलेले आहे.
प्रथमा या कासवाने वेळासपासून प्रवासास सुरुवात केली,
तिथून २५० किमी अंतर पार करून ते डहाणूपर्यंत पोचले, तेथून आता त्याने ८६ किमी प्रवास केला आहे. आता त्याचा प्रवास पाकिस्तानच्या दिशेने सुरु आहे.
याखेरीज आणखी तीन कासवे अजूनही रत्नागिरी जिल्ह्याच्या आसपासच्या समुद्रातच आहेत. त्यांचाही आतापर्यंत सरासरी १५० किमीचा प्रवास झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग, वन विभाग आणि मॅंग्रोव्ह फौंडेशन ऑफ महाराष्ट्र यांचा हा प्रकल्प असून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पात रस घेतला आहे.