शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकोषागारास अटक रंगेहाथ पकडण्यात आली असल्याची घटना घडली आहे.
रमेश काशिनाथ घोडे ( वय – ४७ ) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई गुरुवारी केली आहे.
याबाबत एका व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचे वडील शासकीय नोकर असून तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय उपचाराचे बिल शिरूर येथील उपकोषागार कार्यालय मंजूरीकरीता दिले होते. तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी घोडे याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
पुणे एसीबीने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी आरोपीने १० हजार लाचेची मागणी करुन ९ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रमेश घोडे याला रंगेहाथ पकडले. आरोपी रमेश घोडे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.