किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
इंदापूर बारामती रस्त्यावर दुचाकीस्वाराला इंदापूर कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने शेळगाव नजीक धडक दिली यात दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वालचंदनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे. ( On Indapur Baramati road, a two-wheeler was hit by an unidentified vehicle heading towards Indapur near Shelgaon in which the rider was seriously injured and died. The accident has been reported to Walchand Nagar police.)
आनंदराव सोपानराव निंबाळकर (रा. परीटवाडी लासुर्णे ता. इंदापूर जिल्हा पुणे) या 54 वर्षीय दुचाकी स्वाराचा यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. शेळगाव गावाच्या हद्दीमध्ये तांबोळी पाटील नजीक हा अपघात घडला. 23 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आनंदराव निंबाळकर हे लासुर्ण्याकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली.
यात निंबाळकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लासुर्णे येथील दवाखान्यात तातडीने नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत असून घटनास्थळी इंदापूरच्या पोलीस मदत केंद्राचे फौजदार धर्मापाल सांगळे, सहायक फौजदार महावीर कांबळे, हवालदार वसंत कदम यांनी भेट देऊन पाहणी केली.