बारामती : महान्यूज लाईव्ह
मुर्टी येथील जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या मार्फत सरकारी दवाखाना येथे शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रम अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबीर आयोजित केले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद भगवानराव काकडे यांनी केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बारामतीचे गटविकास अधिकारीअनिल बागल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पंचायत समिती सदस्य राहूल भापकर, मुर्टी गावच्या सरपंच सौ. मंगलताई खोमणे, उपसरपंच किरण जगदाळे, लालासाहेब नलवडे, मोढवे गावच्या सरपंच सौ.शितल मोरे, वाकी गावचे सरपंच किसन बोडरे , मोराळवाडीचे सरपंच नागरगोजे मॅडम, बाळासो गुलाब जगदाळे, जोगवडी गावचे सरपंच सचिन सोनवणे , डॉ. प्रशांत सोनवणे ( कार्डीओलॉजिस्ट ) डॉ.बाळासो सोनवणे ,(जनरल फिजीशियन ) डॉ.सोनाली सोनवणे ,ई.एन . टी.तज्ञ डॉ.प्रिती सोनवणे , ( दंतरोग तज्ञ ) डॉ.प्रसाद भट्टड, ( बालरोग तज्ञ ) रोहीदास तारू, ( नेत्ररोग तज्ञ ) डॉ.ममता पळसे (स्त्रीरोग तज्ञ ) मुर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अतुल उबाळे , डॉ.मिलींद यादव हे उपस्थित होते . मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदय विकार तपासणी, ईसीजी तपासणी ,मोफत प्रयोग शाळा तपासणी, आरोग्य विषयी मार्गदर्शन व औषध वाटप ,गरोदर माता व महीलांची तपासणी ,कान नाक घसा तपासणी ,दंत व मौखिक तपासणी ,नेत्र तपासणी , बालरोग तपासणी इत्यादी मोफत तपासणी करण्यात आली, अशी माहिती डॉ. अतुल उबाळे यांनी दिली.