इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे सोमवारी ही घटना घडली. गावातील रियाज मुलाणी या युवकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दोघा ज्येष्ठ दाम्पत्याचे प्राण वाचले आहेत. लासुर्णे येथील सोमेश्वर हॉटेलच्या चौकामध्ये संध्याकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. ब्रेक निकामी झाल्यामुळे दुचाकी अत्यंत वेगाने एका भिंतीवर आदळली असती अथवा मुख्य रस्त्यावर गेली असती, परंतु या युवकाच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
त्या वेळी रियाज हा सहज तिथे उभा राहिला असताना पाठीमागून अत्यंत वेगाने आलेली दुचाकी थेट भिंतीवर आदळणार होती, परंतु त्याने प्रसंगावधान राखून जीवाची बाजी लावून या दाम्पत्याचे प्राण वाचवले. शिवाय गाडीचा वेग कमी करण्यासाठी त्याने आपली सर्व ताकद वापरली त्याच्या या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे.
काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, असाच काहीसा अनुभव जंकशन (ता. इंदापूर ) येथील वृद्ध जोडप्याला आला. ब्रेक निकामी झालेली या दाम्पत्याची दुचाकी युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.
रियाज मुलाणी असे या धाडसी युवकाचे नाव आहे. अवघ्या 17 वर्षांचा असलेला रियाज मुक्त विदयापीठात 11 वीच्या वर्गात शिकतो. मंगळवारी (दि. 22) नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचे त्याला दिसले.
गाडीचे ब्रेक लागत नाहीत. आम्हाला वाचवा, अशी आर्त विनवणी ते जोडपे करत असल्याचे रियाजच्या निदर्शनास आले. वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला मात्र दुचाकीच्या मागे पळत रियाज याने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाजच्या या प्रसंगावधानामुळे या वृद्ध दाम्पत्य सुखरूप बचावले.
जर ही दुचाकी थांबली नसती तर ती समोरील इंदापूर- बारामती राज्य महामार्गावर गेली असती. मात्र रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रसंगातून बचावलेल्या वृद्ध दाम्पत्याने देखील ‘ बरे झाले लेकरा तू होतास म्हणून आम्ही वाचलो’ अशा शब्दात रियाज चे आभार मानले.
हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून रियाजच्या या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.
मी घराच्या बाहेर साफसफाई करत होतो. एवढ्यात समोरून मला दुचाकीवरून वृद्ध जोडपे येताना दिसले. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत असे ते सांगत होते. मला त्या क्षणी जे सुचले ते मी केले. पळत जाऊन गाडीचे कॅरेज मागून घट्ट धरले. व गाडी थांबवली.