शिरूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ८४६ पोलिस अधिकाऱ्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यात पुणे ग्रामीणच्या २० पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक ते सहायक पोलिस निरीक्षक अशी पदोन्नती केली जाणार होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती रखडलेली होती. अखेर राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यावतीने मंगळवारी रात्री उशिरा पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये राज्य पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या ८४६ पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या २० पोलिस उपनिरीक्षक यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून यामध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सुभाष मुंढे यांसह दौंड पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले भगवान पालवे, शिरूर पोलिस स्टेशनचे हणमंत पडळकर, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन च्या शुभांगी कुटे, बारामती पोलिस स्टेशन चे सोमनाथ वाघमोडे यांसह श्रीगणेश कवितके, दत्तात्रय लिगाडे, नितीन मोहिते, राजेंद्र पवार, सचिन बनकर, रावसाहेब बाबळे, ज्ञानेश्वर बेदरे, कौस्तुभ सागवेकर, नितीन लकडे, अनिल लवटे, सागर ढाकणे, संतोष चामे, सुशील लोंढे या पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे या अधिकाऱ्यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात पूर्वी काम केले असून गुन्हे शाखेत कामाचा चांगला ठसा उमटविला आहे, तर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन च्या शुभांगी कुटे यांनी शिरूर तालुक्यात महिला सुरक्षितता व भरोसा सेल मध्ये उत्कृष्ट कामाचा ठसा उमटविला आहे.