महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात एका व्यक्तीने देशभराचे लक्ष वेधून घेतले आहे. ती व्यक्ती आहे योगा अभ्यास करणारे 126 वर्षांचे काशीचे स्वामी शिवानंद!

योगाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२६ वर्षांचे स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 रोजी मध्ये आठ ऑगस्ट रोजी बंगालच्या श्रीहरी जिल्ह्यात झाला. तब्बल 100 वर्षाहून अधिक काळापासून ते अर्धपोटी जेवणाचे व्रत कायम ठेवून आहेत आपल्या आई-वडिलांचा उपासमारीने मृत्यू झाल्याने त्यांनी हे व्रत कायम ठेवले.

त्यांचे गुरु ओंकार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा अभ्यास केल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी जगभरातील शेकडो देशांचा प्रवास केला आहे. योगासनामध्ये निपुण असलेले स्वामी शिवानंद हे लोकांना योगासाठी प्रेरित करतात. 126 वर्ष वय असलेल्या स्वामी शिवानंद यांनी मसालेदार पदार्थ आणि शारीरिक संबंध यांना दूर ठेवल्यानेच आपल्याला हा आनंद मिळत असल्याचे सांगितले होते. स्वामी शिवानंद हे कोणतेही तेल आणि मसाला नसलेले फक्त उकडलेले अन्न खातात. अर्थात ते दूध आणि फळेही खात नाहीत.
