संदीप मापारी पाटील, बुलढाणा
उन्हाळा सुरु होताच शेतकऱ्यांना वेध लागतो तो, पाण्याचा! काळ्या आईच्या उदरातील पाणी शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते आणि जगण्याची ही धडपड सुरू असते. अशाच धडपडीत वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात दोघा जणांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. ( While digging a well in Risod taluka of Washim district, two people were killed when the edge of the well collapsed while removing rocks from the well by a crane. The incident took place at Wakad-Eklaspur on March 21 at 4 pm.)
वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील विहीरीचे खोदकाम सुरू आसतांनी क्रेन द्वारे विहिरीतील खडक, काढताना विहिरीच्या कडा ढासळल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला. ही घटना वाकद-एकलासपुर येथे २१ मार्च रोजी दुपारी 4 वाजता घडली.
गजानन देविदास लाटे व प्रभाकर गवळी अशी या घटनेतील मृतांची नावे असून आणखी एक जण यामध्ये जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रिसोडचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.