जळगाव : महान्यूज लाईव्ह
मध हा अनेक आजारांवरील उपचारांमध्ये औषध स्वरुपात वापरला जातोच, परंतू मधमाशांच्या दंशाव्दारेही काही आजार बरे केले जातात. अशाच उपचारपद्धतीच्या उपयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुडघेदुखीवर मात केली आहे. स्वत: एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.
एकनाथ खडसे हे गुडघेदुखीने त्रस्त होते. त्यांना चालताना त्रास होत होता, खुर्चीवर बसल्यावर उठताना आधार घ्यावा लागत होता. परंतू मधमाशीच्या दंशाव्दारे त्यांनी उपचार करुन घेण्यास सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्यांना चांगला परिणाम जाणवायला लागला आहे. आता त्यांना चालताना त्रास होत नाही तसेच उठताना आधार घ्यावा लागत नाही.
औरंगाबादमधील नैसर्गिक उपचार तज्ञ नांदेडकर आणि उरळीकांचन येथे नैसर्गिक उपचार केंद्र चालविणारे डॉ. कुलकर्णी यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हा उपचार केला. या उपचारात माकडहाडावर मधमाशीचा दंश केला जातो. मधमाशी या दंशाव्दारे जी विष सोडते, त्या विषाचा नैसर्गिक स्टेराईडसारखा उपयोग होतो, त्यातून गुडघेदुखीच्या वेदना कमी होताता, असा एकनाथ खडसे यांना अनुभव आहे.
खडसे यांनी आतापर्यंत दोन वेळेसच हा उपचार केला आहे. तेवढ्यातच त्यांना खुप फरक जाणवला आहे.
आतापर्यंत हजारो जणांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे, असे नांदेडकर यांनी सांगितले.