किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. त्याप्रमाणे आज छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास तसेच थोर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष युवराज रणवरे, माजी कामगार संचालक दत्तात्रय निंबाळकर, सिव्हिल इंजिनियर तानाजी खराडे, स्टोअर कीपर नंदकुमार चांदगुडे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रेय पिसे, वाहन विभाग प्रमुख गजानन कदम, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत ठोंबरे, गेस्ट हाउस इन्चार्ज संजय मुळीक, गौतम कोळी यांच्यासह कामगार उपस्थित होते.