सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळ्यानिमित्त कौठळी येथे निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते निकाली कुस्त्या लावून या स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नेत्रदीपक पार पडलेल्या निकाली कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. राजवर्धन पाटील यांनी यावेळी मैदानात चाललेल्या कुस्त्यांचा आनंद घेतला. युवापिढी अधिक सक्षम व्हावी यासाठी हे उपक्रम विधायक ठरतात, असे मत या वेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
यात्रा कमिटीचे प्रमुख हिरामण मारकड, माजी सरपंच प्रकाश काळेल, विठ्ठल मारकड, वसंत मारकड, नामदेव पाटील तसेच भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख साहेबराव पिसाळ या वेळी उपस्थित होते.