शिरूर : महान्युज लाइव्ह
नव्याने पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या अभिजीत काळे यांचा बाभूळसर बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत अभिजीत काळे यांनी घवघवीत यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पदावर नाव कोरले. त्यांचे वडील हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल बाभूळसर बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत काळे यांनीही घेतलेल्या परिश्रमाबद्दल व यशाच्या त्रिसूत्रीबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच दिपाली नागवडे,माजी चेअरमन सुनील नागवडे,सचिन मचाले,अमित नागवडे,महेंद्र नागवडे आदी उपस्थित होते.