क्राईम डायरी

कावळपिंप्री येथील खुनाच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अटकेत ! स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांची कारवाई !

शिरूर : महान्युज लाइव्ह

नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कावळपिंप्री येथील खुनाच्या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रांजणगाव एमआयडीसी परिसरात अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.९ मार्च रोजी कावळपिंप्री येथील रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून अचानक हल्ला चढवत पिस्तुलातून गोळीबार करत धारदार शस्त्रानी वार करत खून करण्यात आला होता.या गुन्ह्यातील पाच आरोपी व एक विधी संघर्ष बालक यास ताब्यात घेण्यात आले होते.सदरच्या गुन्ह्यातील अन्य आरोपी विशाल माकर ( रा. ढोकसांगवी, ता.शिरूर )हा फरार होता.आरोपी विशाल हा रांजणगाव एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीस याझाकी कंपनीच्या मागे ताब्यात घेतले. आरोपीने सदरचा गुन्हा इतर आरोपींच्या मदतीने केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,सहायक फौजदार तुषार पंदारे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,राजू मोमीन,अजित भुजबळ, मंगेश थिगळे,योगेश नागरगोजे,नारायणगाव पोलिस स्टेशनचे सचिन कोबल,शामसुंदर जायभाय, मुदस्सर शेख,होमगार्ड दिगंबर ढवळे यांनी केली आहे.

tdadmin

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago