वाई : महान्यूज लाईव्ह
बावधन ता. वाई येथील प्रसिद्ध बगाड यात्रेसाठी या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान बाळासाहेब हणमंत मांढरे वय ५२ ( रा.शेलारवाडी, बावधन ) यांना मिळाला आहे .
बगाड्या बाळासाहेब मांढरे यांनी २००२ साली आपल्या मोठ्या बहीणीला मुलगा होऊ दे असा नवस केला होता त्या नंतर पुढच्याच वर्षी मांढरे यांच्या बहिणीला ५ मुली नंतर मुलगा झाला. नवसपूर्ती नंतर मांढरे यांनी कौल घेण्यास सुरुवात केली. त्या नंतर १७ वर्षांनी त्यांना नवस फेडण्याची संधी प्राप्त झाली आहे.
होळी पौर्णिमेच्या रात्री १२ वाजता देवाचा कौल घेण्यासाठी ४८ नवशे भैरवनाथ मंदिरात जमले होते. यातील ८व्या क्रमांकाच्या बाळासाहेब मांढरे यांच्या बाजूने कौल आल्याने मांढरे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाल्याने शेलारवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बगाड्या मांढरे हे पाचगणी नगरपालिकेत तात्पुरत्या नोकरीस असुन त्यांना 3 बहिणी आणि 1 बंधू आहे.