सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने काल सायंकाळी इंदापूर नगरपरिषदेसमोर व्यसनाची भ्रष्टाचाराची अन्यायाची अंधश्रद्धेची होळी साजरी करण्यात आली..! युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शितप यांच्या संकल्पनेतून व्यसनांची होळी करण्याचे हे यंदाचे हे नववे वर्ष आहे.
व्यसनमुक्त तरूण हीच समाजाची पर्यायाने राष्ट्रांची खरी संपत्ती आहे. युवा क्रांती प्रतिष्ठानने समाजात असणाऱ्या अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करणारी ही होळी साजरी केली असून होळीच्या पवित्र अग्निकुंडात भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा यांची राख करणारी, बुरसटलेल्या विचारांची, ती आलेल्या दारिद्रयाची, अंगी असलेल्या दुर्गुणांची, भिनलेल्या व्यसनांची, चाललेल्या भ्रष्टाचाराची, दृष्ट प्रवृतींची, आलेल्या निराशेची, भरकटलेल्या मनाची, पाझरत्या अज्ञानाची, चिकटलेल्या रूढी-परंपरेची होळी पेटवण्याचा संदेश देऊन अभिनव संकल्प घेऊन होळी साजरी केली.
तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करणे आणि व्यसनमुक्त युवा सामर्थ्य निर्माण करणे, त्यांना समाजसेवेची पर्यायाने देश सेवेचे महत्व पटवून देणे हेच अश्या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांनी सांगितले.
पतंजली योग समितीचे प्रशांत गिद्दे, घाडगे सर, निलेश परबत, देवकर तसेच युवा क्रांती प्रतिष्ठानच्या सायरा आतार, महिला अध्यक्षा कल्पना भोर, युवा अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, अमोल शेलार, आस्लम शेख, पियूष बोरा, आशिष देवकर, निखिल सुर्वे, धरमचंद लोढा, सचिन परबते, दशरथ भोंग, हमीदभाई आतार आदी उपस्थित होते.