दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळवाडी येथील अॅमियन्स हॉटेलमध्ये मद्यपींचा तुफान फ्री स्टाईल राडा झाला. जेवण करताना शाब्दिक बाचाबाचीतुन दोघांवर चाकुने आणि बिअरच्या बाटलीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.याप्रकरणी दौंड पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैभव चौधरी ( रा. काष्टी ता. श्रीगोंदा,जि. नगर ), गणेश दरेकर ( रा. गोपाळवाडी ता. दौड) व इतर एक व्यक्ती ( नाव पत्ता माहीत नाही ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. होळीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी ( दि.१७ ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काष्टी येधील मंगेश तात्यासाहेब बारवकर ( वय २४, व्यवसाय शेती रा. ढोकराई फाटा, बांगदरी, ता. श्रीगोंदा ) व महेश कोथंबिरे हे दोघे अॅमियन्स हॉटेल मध्ये जेवणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या टेबला शेजारील टेबलावर गोंधळ चालु होता. मंगेश बारवकर हे कशाला एवढा कालवा करता असे म्हणालो असता वैभव चौधरी याने टेबलवर असलेली बिअरची बाटली हातात घेवुन, तु कोण आम्हाला विचारणारा, असे म्हणुन बिअरची बाटली डोक्यात मारली. गणेश दरेकर याने खिशातुन चाकु काढून महेश कोथंबिरे याच्या छातीच्या खाली वार केला व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद या दोघांनी दौंड पोलीस ठाण्यात दिल्याने तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पालवे हे पुढील तपास करीत आहेत.