सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आनंदाचे व चैतन्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात असलेल्या धुलीवंदनाच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळी पुणे येथील तळजाई टेकडीवर पदभ्रमण करत असताना नागरिकांच्या समवेत रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला..!

आज धुलीवंदन म्हणजेच धुळवड हा महत्त्वाचा सण समजला जातो. लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्साहात हा सण देशभरात साजरा केला जातो. या सणाला आनंदाचे, चैतन्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आज नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पदभ्रमंती साठी गेले असता, तेथे आलेल्या सहकाऱ्यांच्या समवेत भरणेंनी धुळवड खेळण्याचा आनंद लुटला.
नेहमीच आपल्या वेगळेपणाची व माणुसकीचा विशेष बाज असणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सतत लोकांच्या मध्ये जाऊन काम करताना, आंनद व्यक्त करताना व खेळाडूंच्या समवेत मैदानात उतरून खेळताना सुद्धा दिसून येतात. लोकांच्या सोबत जोडली गेलेली नाळ अतिशय घट्ट आहे. आज नागरिकांच्या समवेत धुलीवंदन खेळताना भरणे मामांच्या चेहऱ्यावरील आंनद दिसून येत होता .
यावेळी धुळवड खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा, नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या. आनंदाने होळी खेळूयात असे आवाहन करत सर्वांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धुलीवंदन च्या शुभेच्छा दिल्या.