संदीप मापारी पाटील, बुलढाणा
अनधिकृत अकृषक वसुली मोहीमेंतर्गत लोणार तहसीलदारांनी तालुक्यातील पळसखेड हिरडव व जांबुल या भागातील तीन वीटभट्ट्या सीलबंद केल्या.
बिगर शेती न करता व शासनाला कोणताही बिगरशेती कर न भरता व्यवसाय करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून लोणार तालुक्यात लोणार तहसीलदारांनी ही कारवाई केली.
या अंतर्गत लोणार तालुक्यातील मौजे पळसखेड, हिरडव, जांबुल शिवारात असणाऱ्या अनधिकृत वीटभट्यावर लोणारचे तहसीलदार सेपन नदाफ यांनी आपल्या पथकासमवेत जाऊन कार्यवाही केली व दिलेल्या दंडाच्या नोटीसचा भरणा सदर वीट भट्टी चालकांनी विहित मुदतीत न केल्यामुळे सदर विट भटयातील तयार मालाची जप्ती केली.
संबधीत वीट भट्टी मालक व शेतमालकाना २१ मार्च २०२२ पर्यंत दंड भरण्याची शेवटची संधी देण्यात आली असून सदर दंड न भरल्यास तयार वीटांचा २२ मार्च २०२२ रोजी जाहीर लिलाव करून त्या लिलावाच्या रकमेतून सदर कराची वसुली शासन जमा करण्याची कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार सेपन नदाफ यांनी सांगितले.
अनधिकृत अकृषक मोहीमेंतर्गत या आर्थिक वर्षात लोणार तालुक्यात ६३५ अस्थापना यांना ४५ लाख रकमेच्या नोटिसा देण्यात आलेल्या असून या पैकी १६५ आस्थापना धारकांनी १० लक्ष ५ हजार ६५० रुपयाचा भरणा चलनाद्वारे शासन जमा केला आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी उर्वरित अस्थापना अकृषक कराचा भरणा करून घ्यावा अथवा सदर रकमेचा बोझा त्याच्या सातबारा वर चढवण्यात येईल व सदर रकमेची वसुली ही महाराष्ट्र् जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६,१८१ नुसार कार्यवाही करण्यात येईल तरी सर्व संबंधितांनी नोटीस प्रमाणे अनधिकृत अकृषक दंडाचा भरणा हा वेळेवर करावा अशी सूचना तहसीलदार सेपन नदाफ यांनी एका लेखी प्रसिद्धीपत्रका मार्फत केली आहे. यावेळी तलाठी गावंडे, तुपकर, मानकर उपस्थित होते.