बारामती : महान्यूज लाईव्ह
विदर्भ खानदेशाच्या भागातून आलेल्या त्या वीट कामगाराच्या डोळ्यात काही काळ पाणी तरळले.. त्याच्या मालकाने दिलेले पाठबळ, डॉक्टरांनी तात्काळ दिलेला प्रतिसाद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेल्या चैतन्य मातृत्व योजनेमुळे आठ नऊ वर्षानंतर त्याच्या घरात चिमुकली पावले दुडूदुडू धावत राहणार आहेत.. आपल्या चिखलातल्या आयुष्याला आकार दिला, म्हणून त्याने डॉक्टरांचे आभार मानले..! (At the Chaitanya Test Baby Center in Baramati, gynecologist Dr. Ashish Jalak and Dr. Due to the social contribution made by Priyanka Jalak, ‘consciousness’ will now spread in the life of this brick worker.)
तो एक सामान्य वीट कामगार.. वर्षाकाठी ठरलेली मजुरी घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याला करावा लागतो.. विवाहानंतर काही वर्ष पाळणा हलला नाही की, भारतीय समाजात कुटुंबातूनच चर्चा केली जाते आणि त्याला वीट कामगारही काही अपवाद नव्हता.. पण धकाधकीच्या आयुष्यात महिलांमधील वाढलेले वंध्यत्वाचे प्रमाण.. आणि अल्प उत्पन्न धारकांना टेस्ट ट्यूब बेबी सारखे उपचार परवडत नाहीत, म्हणून त्याचाही नाईलाज झाला.. मात्र बारामतीतील चैतन्य टेस्ट बेबी सेंटरमध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांनी दाखवलेल्या सामाजिक योगदानामुळे या वीट कामगाराच्या आयुष्यात आता ‘चैतन्य’ पसरणार आहे..

खानदेशातून आलेल्या, इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात असलेल्या एका वीट कामगाराची ही कहाणी..! ही कहाणी तशी जवळपास प्रत्येकाच्या घरात असते.. काहींना महागडा वैद्यकीय खर्च पेलवतो, काहींना पेलवत नाही.. मात्र घरात लहान मूल असणे आणि नसणे यातील आनंद आणि दुःखाची लकेर मात्र प्रत्येक घरात सारखीच असते.
टेस्ट ट्यूब बेबी चा खर्च काही लाखात असतो, अशी एक धारणा अनेकांच्या मनात असते, मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचा विचार करून आणि माणदेशाच्या मातीत आयुष्यभर दुष्काळाच्या संकटाला कवेत घेऊन लढण्याची जिद्द ठेवलेल्या अशाच एका कुटुंबातून पुढे आलेल्या डॉक्टर अशिष जळक यांनी सामान्यांच्या आयुष्यात आनंद पसरवण्यासाठी एक योजना आखली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून अल्प खर्चात टेस्ट ट्यूब बेबी चे उपचार त्यांनी आखले आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत गेला. महाराष्ट्राच्या विविध भागातून या योजनेमध्ये अनेक कुटुंबांनी भाग घेतला आहे. त्यातून अनेकांना हवे असलेले परिणाम मिळाले आहेत. त्यापैकीच भिगवण मधील या वीट मजुराचे एक कुटुंब आहे.
काही दिवसांपूर्वीच वीट मजूर महिलेच्या टेस्ट ट्यूब बेबीचे उपचार यशस्वी झाल्याचे अहवाल आले. गर्भवती महिला आणि तिचे बाळ वैद्यकीय परिमाणानुसार व्यवस्थितरित्या असून बाळाची वाढ व्यवस्थित होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्व तपासण्या करून या मजुरांच्या कुटुंबाला ही माहिती देण्यात आली आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
डॉ आशिष जळक, प्रमुख चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील व निमशहरी भागातील अपत्यहीन जोडप्यांसाठी पेलवत नसलेले खर्च त्यांच्या आवाक्यात आणून अत्यल्प खर्चात टेस्ट बेबी ची योजना सुरू केली. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांच्या आयुष्यात आनंद देणारा हा उपक्रम करताना आम्हालाही समाधान वाटत आहे. आज शेकडो कुटुंबे दवाखान्यात उपचार घेऊन समाधानी आहेत.