माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील साळवडे येथे नुकताच मोठया भक्तिमय वातावरणात ३१ वे अखंड हरीनाम सप्ताह पार पडला. सप्ताहात समाज प्रबोधन झालेल्या कीर्तन आणि प्रवचनात सांप्रदायिक मंडळी तल्लीन झाली होती. येथील समस्त ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळाने आयोजित केलेल्या या सप्ताह सोहळ्याचे अमृतनाथस्वामी आश्रमचे ह. भ. प. अमृत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.
ह.भ.प. नवनाथ महाराज लिम्हण, ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे (शिवचरित्रकार), भागवताचार्य ह.भ.प. पांडुरंग महाराज शितोळे, जळगावचे ह.भ.प. शिवा महाराज बायसकर, ह.भ.प. माऊली महाराज खडकवाडीकर, ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री यांनी केलेल्या समाजप्रबोधन किर्तनाने सप्ताहात चैतन्य निर्माण झाले होते. तर ह.भ.प. ओंकार पवार, ह.भ.प. कैलास खुडे, ह.भ.प. सौ. गायत्री कोंडे, ह.भ.प. बाळुबुवा अवसरे, ह.भ.प. पांडुरंग महाराज शास्त्री, ह.भ.प. तुळशीराम बुवा यादव व ह.भ.प सुधाकर सुरवाडकर यांनी केलेल्या प्रवचनात भाविक तल्लीन झाली होते.
दरम्यान,ह.भ.प. कृष्णाजी रांजणे, योगेश भोसले, आनंद चौरडिया यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. तर वीणापूजन ह.भ.प. बाळकृष्ण दसवडकर, ह.भ.प. गणेश भगत, उद्योजक विनायक निंबाळकर, सुनिल शिंदे, राजू साखला यांच्या हस्ते करण्यात आले. कलशपुजन ह.भ.प. माऊली पवार, ह.भ.प. चंद्रकांत कोकाटे यांनी केले. तर ह.भ.प. सुधाकर महाराज सुखडकर (आळंदी) यांनी व्यासपीठ नेतृत्व केले. ह.भ.प एकनाथ कोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे. भोरचे सभापती लहुनाना शेलार यांनी देखील सप्ताहात सहभाग घेतला होता. परिसरातील भजनी मंडळानी सहभाग घेतला होता. सप्ताहात अन्नदान व महाप्रसाद करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, महिला, वारकरी भाविक उपस्थित होते.