दौंड : महान्यूज लाईव्ह
रशिया व युक्रेन यांच्यांत सुरू असलेल्या युद्धाचा गैरफायदा घेऊन सध्या सगळीकडे खाद्य तेलाचे भाव होलसेल व्यापारांनी यांनी भरमसाठ वाढवले आहेत. हे व्यापारी वर्गाचे मोठे षडयंत्र आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी दौंड शहर काँग्रेस आय पक्षाने केली आहे. ( Russia-Ukraine war is being taken advantage of even in villages ..! Traders’ conspiracy to raise fuel and edible oil prices! Daund accuses Congress ..!)
याबाबत दौंड तहसीलदार यांना पक्षाच्या वतीने निवेदन दिले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने आधीच जनतेच कंबरडं मोडले असताना पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचे भरमसाठ भाववाढ केली जात आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे. शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतीमालाचे बाजार दर वाढवण्याची परवानगी द्यावी व तशा सुचना कृषी उत्पन्न बाजार समिती ला देण्यात यावे.
मात्र व्यापारी वर्गाकडून नियमबाह्य खाद्य तेलाचे भाव वाढ केली जात आहे. अशा होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकानांची व रेकॉर्डची तपासणी करावी व दोषी व्यापारी यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दौंड शहर काँग्रेस पक्षाने तहसीलदार संजय पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी दौंड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महेश जगदाळे तालुका महासचिव प्रकाश सोनवणे, उपाध्यक्ष पोपट गायकवाड, निलेश बगाडे, अजित हिंगणे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.