सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांची निवड झाली. मिलिंद साबळे यांच्या निवडीचे तालुक्यात अभिनंदन होत असून साबळे यांच्या चाहत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
नुकताच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. युवक काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष पदाकरिता मिलींद साबळे यांना सर्वाधिक मते मिळाली. या निवडणुकीत तालुका पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीकरिता अध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार रिंगणात होते.
12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सदस्य बनताच ऑनलाईनरीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मत द्यावे लागले होते. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद साबळे यांना विक्रमी मते मिळाली. दिनांक 7 मार्च ला जाहीर निवडणुकीच्या निकाला नुसार मिलिंद साबळे यांना सर्वाधिक 2227 मते मिळाली आहेत. साबळे यांनी इतर उमेदवारांना मागे टाकले. युवकांचा विश्वास जिंकल्यानेच निवडणुकीत मोठ्या फरकाने मते मिळाली असल्याचे साबळे यांनी म्हटले.
ऑनलाईन मतांची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाईचं वाटप करून आनंद साजरा केला. तालुका युवक काँग्रेसच्या निवडणुकीत एकूण 5052 मतदान झाले. निकालानुसार तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांना सर्वाधिक मते घेतली आहेत.यांना सर्वाधिक 2227मते मिळाली आहेत. अरूण राऊत 785 मते मिळवून उपाध्यक्षपदी निवड झाली.
मिलिंद साबळे यांचे तालुक्यातून महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सरचिटणीस तानाजी भोंग, ऊजेर शेख, राहुल आचरे, भगवानराव पासगे, सुफियान जमादार, नितीन राऊत, संतोष शेंडे,अभिजीत गोरे, संदीप शिंदे,भुषण बोराटे, अक्षय शेलार, इंदापूर तालुका महिला अध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी अभिनंदन केले.