अनील गवळी
पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यामध्ये एका शाळकरी मुलीवर वर्गात घुसून चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेतील मुलगी १० वीत शिकतेय. आता ही मुलगी रुग्णालयात आहे. या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेतली. आजपासून तिला १० वीची परीक्षा द्यायची असल्याने तिला लेखनिक दिला जाईल, असे निर्देश त्यांनी दिले.
याबाबत बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ” काल एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्यात आलेल्या मुलीची मी भेट घेतली. मुलीची मानसिक अवस्था लक्षात घेऊन तिचा जबाब नोंदवला नाही. तिला १० वीची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी लेखनिक देणार आहे. अशा पद्धतीच्या घटना घडू नये, यासाठी परीक्षेच्या ठिकाणी निर्भया पथक नेमले जाणार आहे. “
मुलीवर हल्ला झाल्यावर २० मिनीटे ती मुलगी तशीच होती, तिला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने वाचवले नाही, त्यामुळे शाळेवरही कारवाई करणार असल्याचेही रुपाली चाकणकरांनी सांगितले आहे.
दरम्यान या मुलीवर हल्ला केल्यावर आरोपीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.