बारामती : महान्यूज लाईव्ह
आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त बारामती तालुका वैद्य मापन अधिकारी श्री. टाळकुटे साहेब ,सहाय्यक एस. पी. खांडेकर यांनी बारामती तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष नवनाथ मलगुंडे, सचिव शेखर हुलगे यांच्या समवेत एसटी आगार बारामती येथे ग्राहकांना वस्तू वजना संबंधी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बारामती तालुका ग्राहक पंचायत दिग्दर्शित दिनदर्शिकेचेही वाटप करण्यात आले.
प्रवासी ग्राहकांना वजन काटा निरीक्षण, पॅकबंद वस्तूंचे वजन, नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी इत्यादी संबंधी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.