पुणे : महान्यूज लाईव्ह
दहावीच्या निरोपसमारंभाच्या कार्यक्रमात घुसून दहावीच्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुणे येथील वडगावशेरी येथे घडली आहे. काल ( दि. १४ ) रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
वडगाव शेरीतील इनामदार शाळेत हा प्रकार घडला असून आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. त्याने सर्व विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या समोर या मुलीवर चाकुने सपासप वार केले.
या हल्ल्याने हि विद्यार्थिनी रक्तबंबाळ झाली. तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी हॉस्पीटल, वडगाव शेरी येथे मुलीवर उपचार सुरु आहेत. आरोपी तरुण घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.
घटनेनंतर शाळेत पालकांनी मोठी गर्दी केली होती. या सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.