सोलापूर : महान्यूज लाईव्ह
काल ( रविवारी ) रात्री वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात ४ वारकऱ्यांचा जागीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथून वारकऱ्यांची दिंडी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमधून पंढरपूरकडे निघाली होती. सोलापूर – पुणे महामार्गावरील कोंडीनजिक भरधाव वेगात असलेल्या एका मालवाहू ट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की ही ट्रॅक्टर ट्रॉली ६०० फूट अंतरापर्यंत फरपटत जाऊन सातजणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. ३५ ते ४० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.