मुंबई : महान्यूज लाईव्ह
बॉलिवुडमधील आमीर खान हा असा अभिनेता आहे, की जो प्रसिद्धीपासून दुर राहतो. आमीर सोशल मिडियावरही उपलब्ध नसतो. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या करोडो चाहत्यांना असते.
किरण रावला जुलै २०२१ मध्ये दिलेल्या घटस्फोटानंतर आमीर बद्दलच्या अनेक अफवा सतत पसरत राहिल्या. आमीर आता तिसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले गेले. त्याचे नाव अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्याशी जोडण्यात आले. त्यांचे लग्न झाल्याचे फेक फोटोही सोशल मिडियावर फिरू लागले. परंतू यावर आमीरने आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता आमीरने याबाबत सविस्तर भुमिका मांडली आहे.
किरण आणि मी आमच्या नवरा बायकोच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नव्हतो. त्यामुळे एकमेकांशी सविस्तर बोलल्यानंतर आम्ही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलो.आज आम्ही नवरा बायकोच्या भूमिकेत नसलो तरी, एक कुटुंब आहोत. माझी पहिली पत्नी रीना हिच्याचीही माझे अतिशय चांगले संबंध आहेत. मी, रिना, किरण आणि सत्यजीत भटकळ मिळून पाणी फौंडेशनचे काम एकत्रितरित्या करत आहोत.
त्यामुळे दुसऱ्या कुणाशी लग्न करण्यासाठी मी किरणला घटस्फोट दिला, या बातमीत काहीही तथ्य नाही, असे आमीरने म्हणले आहे.