अनिल गवळी
पुणे : महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वीचा निरोप समारंभ संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाघुले सर यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शासनाच्या वतीने परीक्षेबाबत दिलेल्या सूचनांची माहिती दिली. जागरूकपणे परीक्षेची तयारी करा व अभ्यास करून खूप मोठे व्हा, असे सांगितले. हा निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ असल्याचे सांगून इयत्ता अकरावीला आपण याच शाळेत यावे, ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच संस्थेच्या वतीने सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या वतीने वर्गशिक्षक मच्छिंद्र रकटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या कालावधीमध्ये घेण्याच्या काळजीबाबत सांगितले. श्रद्धा ससाणे यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली व परीक्षेसाठी सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांच्या वतीने शोभा कांबळे, रोहिणी पवार, प्रेरणा साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावीच्या वर्गाकडून विद्यालयास भेटवस्तू देण्यात आली. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी अरविंद शेंडगे, घनशाम पाटील, युवराज देशमुख,वहिदा अवटी, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलिनी गायकवाड, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद, तसेच दीपक जांभूळकर, कैलास वाडकर, लोखंडे नानी , सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पवार या विदयार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन गोरक्षनाथ केंदळे यांनी केले.