शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूरला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून घवघवीत यश मिळवत अधिकारी झालेले तब्बल ३० अधिकाऱ्यांचा शिरूर येथे सत्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले व राज्य पोलीस दल २०२१ च्या परीक्षेत श्लोक अकॅडमीच्या निवड झालेल्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सुरेशकुमार राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा पालन केल्यास यश हमखास मिळेल. या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अविनाश परांडे यांचेही कौतुक केले.
पोलीस दल व सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या अनेक युवक युवतींना गेली अनेक वर्षापासून योग्य मार्गदर्शन आणि त्यांची विशेष तयारी क्रांती प्रतिष्ठाण संचलित श्लोक करिअर अकॅडमी, शिरूर च्या माध्यमातून करत आहे. या अकॅडमीतून समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना माफक फी आकारून त्यांची पोलीस तसेच सैन्य दलात भरती होण्याची स्वप्न अविनाश परांडे यांच्या माध्यमातून साकारले आहे.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करताना आपले टार्गेट निश्चित करण्याचा मौलिक सल्ला दिला.
यावेळी सिने अभिनेते ख्वाडा, बबन फेम संदीप बोरगे यांनी यश मिळवायचे असेल तर योग्य मार्गदर्शक हवा असे आवर्जुन सांगितले व विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सुविधा उपलब्ध करण्यासाठी ११ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी देऊ केला.
मंगेश कोठावळे यांनी आपल्या मनोगतातून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा संघर्ष व केलेला अभ्यास , मैदानी चाचणीची तयारी याविषयीची माहिती दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले सागर कदम, किरण उकिर्डे, अकॅडमीचे विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते.
श्लोक अकॅडमीचे संचालक अविनाश परांडे यांनी आभार व्यक्त करताना पुढील पोलीस भरतीमध्ये अकॅडमीचे जास्तीत जास्त विद्यार्थी भरती कसे होतील त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.विनोद शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.