धुळे : महान्यूज लाईव्ह
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर भगतसिंग मित्र मंडळ, सावता परिषद जिल्हा धुळे व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय धुळे व्हिजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दि. १० मार्च रोजी गुरुवारी वीर भगतसिंग चौकात आयोजित केले होते. यावेळी पंचक्रोशीतील २७७ नागरीकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. यातून २६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली असून १९ रुग्णांची शुक्रवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर भगतसिंग मित्र मंडळ,सावता परीषद धुळे, तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्रालय सेंटर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ वी पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर गुरुवारी घेण्यात आले. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी २७७ नागरीकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.यातून २६ रुग्णांची मोतीबिंदू आढळून आल्याने १९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शुक्रवारी नंदुरबार येथे कांतालक्ष्मी शहा आय हॉस्पिटल मध्ये करण्यात येणार आहे. शिबीरात जवळ व लांब शास्त्रोक्त पद्धतीने ५० जणांच्या डोळ्यांचा नंबर काढून देण्यात आला.
डॉ. प्रकाश कोळी यांनी चष्माचा नंबर काढून दिला. शिबीरात कांतालक्ष्मी शहा नेत्रालय व व्हिजन सेंटर धुळेचे नेत्रतज्ज्ञ डॉ. तुषार देवरे, समुपदेशक योगेश साळुंखे, समन्वयक प्रशांत भदाणे यांनी मोतीबिंदू
नेत्र तपासणी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, रविंद्र माळी, माळी समाजाचे अध्यक्ष भिका माळी, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी दलितमित्र/रुग्ण मित्र दिलीपभाऊ माळी,नंदलाल बडगुजर, पी. के. शिरसाठ ( पत्रकार ) ,अशोक भिका माळी ,छगन बडगुजर, रविराज माळी, देविदास बडगुजर , वसंत बडगुजर ,रमेश माळी, संतोष खैरनार, शहा लॅबचे डॉ. स्वप्नील जैन यांनी परीश्रम घेतले.