महान्यूज लाईव्ह विशेष
‘ मैने प्यार किया ‘ मधील कबुतर ‘ पहिले प्यार की पहिली चिठ्ठी ‘ घेऊन उडाले होते. पण आता जमाना फार पुढे गेले आला. आता कबुतरे उडवली जात आहेत, ती बॉंम्ब घेऊन जाण्यासाठी किंवा जीवघेण्या आजाराचे जंतू घेऊन जाण्यासाठी ! काय, विश्वास नाही बसत ना, पण हे आम्ही नाही म्हणत तर कोण म्हणतय बघा !
रशियाने अमेरिकेवर असा आरोप केला आहे. रशियाच्या आरोपानूसार त्यांनी असे काही संक्रमित पक्षी पडकले आहेत. हे पक्षी त्यांच्यासोबत नकाशे, कागदपत्रे आणि अतिशय छोटी हत्यारे घेऊन उडत होते. रशियाने असेही म्हणले की अमेरिका या पक्षांना अतिशय घातक अशा रोगाने संक्रमित करून पाठवत आहे. या रोगामध्ये ५० टक्के पक्षी मरण्याची शक्यता असते. अर्थातच त्यांच्याकडून हा रोग माणसामध्ये संक्रमित करण्याची योजना आहे.
रशियाचा हा दावा अर्थातच अमेरिकेने खोटा ठरविला आहे. पण याअगोदर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या अंडर सेक्रेटरी व्हिक्टोरिया नुलॅन्ड यांनी म्हणले होते की, अमेरिका युक्रेनमधील जैविक शोध केंद्राना रशियाच्या हातात पडण्यापासून वाचविण्यासाठी युक्रेनला मदत करत आहे. त्यांच्या या खुलाशामुळेच अमेरिका आणि युक्रेन जैविक हत्यारे बनवित असल्याची चर्चा सुरु झाली होती.
अर्थात अमेरिका आणि रशिया दोघेही एकमेकांवर अशा प्रकारे जैविक शस्त्रांचा वापर करत असल्याबद्दल आरोप करत असतात. या युद्धातही जैविक शस्त्रांच्या वापराबाबत एकमेकांवर आरोप होत आहेत.
युद्धासाठी पक्षांच्या वापराचे उल्लेख फार पूर्वीच्या काळापासून आढळतात. आज इतक्या आधुनिक युगातही पक्षांनी आपले स्थान टिकवलेले दिसते आहे. रशिया हे आरोप करीत आहे, त्याचे सर्वांना मान्य होतील असे पुरावे पुढे आल्यासच याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.