मुंबई : महान्यूज लाईव्ह
नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्याची मतमोजणी होऊन निकालही लागले. आता या निकालांवरून देशभरातील राजकीय पंडीतांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. या निवडणूकांमध्ये अनेक विक्रम झाले, त्यामधील एका विक्रमाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा विक्रम मोडला गेला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविताना अजीत पवार यांनी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांना धूळ चारली होती. तब्बल १ लाख ६५ हजार मतांनी पडळकरांचा पराभव झाला होता. देशभरात विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा हा विक्रम होता. ऐवढे मताधिक्य आजपर्यंत कोणालाच मिळालेले नव्हते.
मात्र आता अजीत पवारांचा हा विक्रम उत्तर प्रदेशात मोडला गेला आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र पंकजसिंह यांनी नोएडा मतदारसंघात १ लाख ८१ हजार ५१३ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ ६२ हजार ८०६ मते मिळाली आहेत. एकुण मतांपैकी तब्बल ७० टक्के मते ही पंकजसिंह यांनी मिळवली आहेत.
मात्र पंकजसिंह यांना मागे टाकण्याची किमया करण्याची ताकद अजीत पवारांमध्येच आहे.