मुंबई : महान्यूज लाईव्ह
देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल काल लागले आहेत. त्यातील उत्तर प्रदेश आणि पंजाबची चर्चा सगळ्यात जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी आपली सत्ता राखली आणि पंजाबमध्ये मात्र आम आदमी पार्टीने कॉंग्रेसचा सुफडा साफ केला आहे.
याबाबतच्या चर्चेन शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. दिल्लीत केलेल्या कामामुळे पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला बहुमत दिले. माझ्या घरात काम करणाऱ्यांनीही आम आदमी पार्टीला मते दिली असेही त्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंहांसारख्या नेत्याला दूर करणे कॉंग्रेसला भारी पडले. दिल्लीत झालेल्या आंदोलनात पंजाबचे लोग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या आंदोलनाचा मोठा परिणाम झाला. लोकांनी भाजप, कॉंग्रेस, अकालींना नाकारत `आप ‘ ला सत्ता दिली, असेही शरद पवार म्हणाले आहेत.