सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कुटुंबाच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडला असून पुतण्याने चुलतीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुतण्या केतन कांतीलाल पवार (वय 21 वर्षे) यास अटक केली आहे.
याप्रकरणी भिगवण पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने व तत्परतेने या प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान ही घटना घडली. वेळोवेळी पुतण्याने चुलतीवर जबरदस्तीने बलात्कार केला व तुझ्यासहित तुझ्या कुटुंबाला कापून टाकीन अशी धमकी दिली.
याप्रकरणी भिगवण पोलिसांनी केतन पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास फौजदार कदम करत आहेत. मात्र या घटनेने भिगवण व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.