महान्यूज लाईव्ह विशेष
आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या विधीमंडळात मांडला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजीत पवार हे हा अर्थसंकल्प सादर करतील.
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार हे विधीमंडळात पोचले असून आता अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात झाली आहे.
विकासाची पंचसुत्री सादर करत आहे म्हणून अजीत पवार यांनी सुरुवात केली आहे.
शेततळ्यांसाठी अनुदानात वाढ . आता ७५,००० हजारापर्यंत अनुदान मिळणार
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये अनुदान दिले जात होते, ते आता ७५००० करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार, २५० कोटींची तरतूद
राज्यात १२.१ टक्के विकासदर अपेक्षीत आहे. हा देशाच्या विकासदरापेक्षा जास्त आहे.
बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळवली. यामुळे गोवंशाच्या चांगल्या जाती अबाधित राहतील.
६० हजार कृषीपंपांना वीज देणारा, मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयाचा निधी
प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प उभारणार.
१०४ सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षात पुर्ण करणार.
आरोग्य –
आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींची तरतूद
८ कोटी खर्च करून ८ मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार
टाटा कॅन्सर संशोधन केंद्रास रायगड जिल्ह्यात खानापूर येथे जागा देणार
पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. येथे सर्व प्रकारच्या आरोग्य उपचार सुविधा एकाच छताखाली दिल्या जाणार आहेत.
मुंंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयाला १०० कोटी रुपये
सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी १०० खाटांची महिला रुग्णालये उभारणार
सर्व ठिकाणी सफाई ही यांत्रिक पद्धतीने केली जाणार. सफाई कामगारांना सन्मान मिळवून देणार.
तृतियपंथियांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासठी भरीव तरतूद
अंगणवाडी सेविकांना मोबाईल.
थोर समाजसुधारकांच्या नावाने अध्यापन केंद्रे सुरु करणार.
आश्रम शाळांना ४०० कोटी रुपये
नाशिक पुणे रेल्वेप्रकल्पासाठी ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार. एकुण खर्च १६००० कोटी आहे.
शिवडी नाव्हा शेवा सागर सेतू २०२३ अखेरपर्यंत सुरु होणार. ६४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
एसटी महामंडळाला नवीन १००० बसेस देणार , ३ हजार पर्यावरणपुरक बसेस सुरु करणार. इलेक्ट्रीक वाहने वाढण्यासाठी प्रयत्न करणार. राज्यात ५००० इलेक्ट्रीक चार्जिंग केंद्रे उभी करणार. शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी.
भाऊचा धक्का ते बेलापूर या जलमार्गावरील वॉटर टॅक्सीचे भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न
३ लाख ३० हजार नव्या नोकऱ्या तयार करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य, ९८ गुंतवणूक करार गेल्या दोन वर्षात झाले. १ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक झाली.
आपत्ती प्रतिबंधक योजनांसाठी मदत आणि पूर्नवसन खात्याला मोठी तरतूद . स्वारगेट – कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी प्रयत्नशील
रायगड किल्ला सुशोभिकरणासाठी १०० कोटींचा निधी देणार
युनेस्कोकडे शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमीकाव्याच्या लढाईबाबत विशेष प्रकल्प तयार करून पाठविण्यात येईल.
मुंबई, पुणे, नागपूर येथे हेरिटेज वॉक सुरु करणार
कोकण विभागाला आपत्ती निवारणासाठी ३२०० कोटीचा निधी
पंढरपूर मंदिर सुशोभिकरण प्रकल्पासाठी ७३ कोटी ८० लाखाची तरतूद
समृद्धी महामार्ग भंडाऱ्यापर्यंत वाढविणार, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत नेणार.
मुंबईच्या आजुबाजूच्या भागांना जलमार्गाने जोडणार
शिर्डी, रत्नागिरी विमानतळासाठी निधी. महाबळेश्वर, अजिंठा वेरूळ येथे सुविधा केंद्र सुरु करणार. राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या विकासासाठी निधी.
नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दुप्पट भत्ता. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यासाठी १०० कोटींची तरतूद . ४० वयाच्या पेक्षा जास्त वयाच्या सरकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणार.
प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभारणार. महाराणी सईबाई यांचे राजगड किल्ल्याखालील गावातील स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण करणार.
जायकवाडी, गोसेखुर्द येथे जलपर्यटन केंद्र सुरु करणार
रा
सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यावर.