सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती संभाजी राजे यांचे बलिदान दिनाचे औचित्य साधून युवा क्रांती प्रतिष्ठान चा ११ वा वर्धापन दिन तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत शिताप यांच्या वाढदिवसा निमित्त आज इंदापूरात रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत कालठण रोडवरील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचा, तसेच माजी सैनिक, रुग्णवाहिका चालक, गुरुजन, सर्वश्रेष्ठ रक्तदाते यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
सायंकाळी सात वाजता समाज भूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे यांचे तरुणांमधील वाढत्या आत्महत्या आणि शंभूचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
युवक क्रांती प्रतिष्ठान, विश्व वारकरी संघ, इंदापूर सायकल क्लब, जय हिंद माजी सैनिक संघटना, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, भारतीय जैन संघटना, संघर्ष ग्रुप निमगाव केतकी, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूर, रचना परिवार, श्री दत्त प्रतिष्ठान, शिवभक्त परिवार, कोळी महासंघ इंदापूर तालुका, मल्लिकार्जुन ब्लड बँक सोलापुर, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, लकी परिवार इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानास उस्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.