खंडाळा : महान्यूज लाईव्ह
पाटण तालुक्यातील डाकेवाडी- काळगाव येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्दांची गुंफण करत यशवंतराव चव्हाण यांना ‘शब्दवंदना’ दिली आहे. असंख्य शब्दांतून रेखाटलेली यशवंतरावांची भावमुद्रा चित्रकाराच्या कलेला दाद देण्यासारखी आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी सरंक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकेकाळी ‘हिमालयाच्या भेटीसी सहयाद्री धावला’ असा लौकीक मिळवला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचे ‘यशवंतराव’ चव्हाण या शब्दांत सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे.
राजकारण, समाजकारण याबरोबर साहित्यावरही तितकेच प्रेम करणाऱ्या आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना या चित्राच्या माध्यमातून डॉ. डाकवे यांनी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे कौतुक होत आहे.