बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील इंडियाने किंडरजॉय आणि रोशेर या दोन चॉकलेट उत्पादनात देशात आणि जगभरात मोठा ग्राहक वर्ग आणि ग्राहकांची पहिली पसंती मिळवल्यानंतर आता फेरेरो इंडियाने जेवणानंतरच्या बडीशेपयुक्त मुखवासाच्या उत्पादनाची बारामतीतून सुरुवात केली आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा टिकटॅक हे मिंटयुक्त बडीशेप कन्फेशनरी खाल्ली असेलच, पण आता ही कन्फेक्शनरी टिकटॅक सीड्स या नावाने नव्या स्वरूपात बारामतीतून उपलब्ध करण्यात आली आहे.
टिक टॅक या पॅकेज्ड गोड पदार्थांची जगातील आघाडीची उत्पादक कंपनी फेरेरो आहे. या फेरेरो समूहाचा भाग असलेल्या फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दोन प्रकारात ते देशभरात उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये बडीशेप आणि आले व वेलची अशा दोन स्वादात मध्ये हे टिकट्याक सीड्स तयार करण्यात आले आहेत. जेवण झाल्यानंतर बडीशेप, मसाले, साखर अशा विविध घटकांपासून बनवलेले मुखवासाचे सेवन करणे ही प्राचीन भारतीय परंपरा आहे.
हे लक्षात घेत टिकटॅकने हे नाविन्यपूर्ण कुरकुरीत कवच असलेले छोटे बॉलसीड तयार केले आहेत. याची किंमत एक रुपये ठेवली असून, त्यामुळे हे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. हे मेड इन इंडिया उत्पादन असून ते फेरेरो इंडियाच्या बारामतीतील कारखान्यात तयार करण्यात आले आहे.
यासंदर्भात टिकटॅक व रोशन नटेला विभागाचे भारतातील विपणन प्रमुख श्री जोहर कापूसवाला म्हणाले, भारतीय बाजारात लहान व्यवहारांना चांगला वाव मिळतो. टिकटॅक सीड्स हे भारतीय तरुणांच्या मदतीने भारताच्या परंपरा विषयी असलेले प्रेम जाणून घेऊन सखोल संशोधनातून तयार करण्यात आले आहे. या उत्पादनाची किंमत एक रुपया ठेवण्यामागे बाजारपेठेचा विस्तार करणे आणि ती जास्तीत जास्त ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.