पुणे : महान्यूज लाईव्ह
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मिड अर्थ आउटडोअर्स तर्फे ” इनटू द वाइल्ड ” या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन आज ( शुक्रवारी ) अभिनेत्री नेहा महाजन , झी २४ तासचे बिझनेस हेड व मुख्य संपादक नीलेश खरे व प्रसिद्ध निसर्ग-अभ्यासक राहुल मराठे यांच्या हस्ते वेस्टएन्ड मॉल, औंध येथे करण्यात आले होते
४ मार्च ते ६ मार्च पर्यत दु. १२ ते रात्री ९ पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले होते. ५ मार्चला संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेते व छायाचित्रकार मिलींद गुणाजी हे या प्रदर्शनाला भेट दिली. नवोदित वन्यजीव छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, शहरी नागरिकांना निसर्गाची ओळख व्हावी हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे संचालक सुरेंद्र देसाई यांनी सांगितले.
या प्रदर्शनात भारतातील प्रसिद्ध छायाचित्रकार जैनी मारीया ( बंगलोर ), धर्मेंद्र खंडाल- ( सवाई माधोपूर ), किरण पुरंदरे- ( पुणे ),अभिनेते मिलिंद गुणाजी, ओंकार धारवाडकर- ( गोवा ) अशा तज्ज्ञांची छायाचित्रे इथे होती. यात कीटक- फुलपाखरे, पक्षी, प्राणी, लॅण्डस्केप्स असे विभाग करण्यात आले होते