मुंबई : महान्यूज लाईव्ह
क्रिकेटमधील नियम ठरविण्याचा अधिकार असलेल्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमात मोठे बदल केल्याची घोषणा केली. हे नवे बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
या बदलांनूसार आता चेंडु चमकविण्यासाठी थुंकी वापरण्यास बंदी घातली आहे. यापूर्वीही कोरोनामुळे ताप्पूरत्या स्वरुपाची बंदी घालण्यात आली होतीच. आता मात्र कायमस्वरुपी नियम म्हणून हा बदल करण्यात आला आहे. मात्र खेळाडूंनी थुंकीऐवजी घामाचा वापर यापूर्वीच सुरु केला होता. त्याला अजूनही बंदी नाही.
नव्या नियमानूसार एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानात येणारा नवा खेळाडूच स्टाईक घेईल. यापूर्वी एखादा फलंदाज जर कॅच आऊट होण्याआधी दुसऱ्या फलंदाजाला क्रॉस करत असेल तर नवा फलंदाज स्ट्राईक घेत नसे. ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर जर विकेट पडली असेल तर दुसऱ्या बाजूचा फलंदाज नव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेतो. आता मात्र कोणत्याही परिस्थितीत मैदानात येणारा नवा खेळाडूच आता स्ट्राईलला येईल.
जोपर्यंत गोलंदाज चेंडू टाकत नाही, तोपर्यंत नॉन स्ट्राईकर फलंदाजाने धावरेषा ओलांडायची नसते. जर त्यापूर्वी त्याने धावरेषा ओलांडली आणि गोलंदाजाने चेंडू स्टॅम्पला लावला तर हा फलंदाज बाद दिला जातो. याला मांकडिंग असे म्हणतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात भारताच्या विनू मांकड यांनी सर्वप्रथम यापद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राऊन यांना बाद केले होते. यामुळे या प्रकाराला मांकडींग असे म्हणले जाते. आतापर्यंत मांकडिंग नेहमी वादात सापडत असे. आता नव्या नियमानूसार मांकडिंगला रनआऊट समजले जाणार आहे.
याशिवाय ज्यावेळी मैदानावर कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा अन्य कोणत्याही वस्तूमुळे कोणत्याही संघाचे नुकसान होत असेल तर तो बॉल डेड बॉल मानला जाईल.
हे नियम कधी लागू करायचे हे आता आयसीसी आणि अन्य बोर्डांवर हे अवलंबून आहे.