शिरूर : महान्युज लाइव्ह
शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत सणसवाडी येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री जिओ कंपनीचे मोबाईल टाँवरच्या बँट-या व डिझेल कोणीतरी चोरी केल्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते .
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रशांत भगवान गायकवाड (रा. धामारी )यास ताब्यात घेतले.यावेळी त्याचा दुसरा साथीदार भरत नानाभाऊ मोहिते याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईल टॉवरच्या एकूण चार बॅटऱ्या व डिझेल हस्तगत करण्यात आले आहे.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके,सहा.पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहा.पो.फौज.तुषार पंदारे ,पो.हवा जनार्दन शेळके,पो.हवा अजित भुजबळ,पो.हवा राजू मोमीन,पो.ना. मंगेश थिगळे,पो.ना. योगेश नागरगोजे यांनी केला आहे.