शिरूर: महान्युज लाइव्ह
शिरूर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्याधाम प्राथमिक शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांचा महिला दिनानिमित्त शिक्षिकांनी सन्मान केला तर त्यांनी सर्व शिक्षिकांना शुभेच्छा देताना ‘आपले विद्यार्थी अभ्यासाबरोबरच संस्कारमूल्य , नितीमूल्य जपणारी व समाजातील आदर्श व्यक्ती बनवण्यावर भर द्यावा ‘ असे आवाहन केले.
महिला दिनानिमित्त विद्याधाम प्राथमिक शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकांसाठी रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धांचे आयोजन केले होते.रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण पंधरा शिक्षिकांनी सहभाग घेताना बेटी बचाओ बेटी पढाओ , स्त्री शिकली प्रगती झाली , झाडे लावा झाडे जगवा , पृथ्वी वाचवा अशा अनेक विषयावर विविध रंगी आकर्षक रांगोळ्या काढल्या.
आर . एम . डी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांनी रांगोळी प्रदर्शनास भेट देऊन सर्व शिक्षिकांचे कौतुक केले.परीक्षक म्हणून संदीप वेताळ यांनी काम पाहिले