कराड : महान्यूज लाईव्ह
हल्लीच्या युगात किशोरवयीन मुली वयात येण्यापूर्वी तिच्या मनाची तयारी आणि वैचारिक आत्मनिर्भर करून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मुली पौगंडावस्थेत जात असताना त्यांचा आहार समतोल राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन डॉ. मनीषा जाधव यांनी केले.
नांदगाव ( ता.कराड ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात डॉ. मनीषा जाधव बोलत होत्या. यावेळी डॉ. शुभांगी माळी व ग्रामपंचायत सदस्या अनिता पाटील, संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे ( गुरुजी ) सचिव एस. टी. सुकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अलका गुरव यांनी आभार मानले. कार्यक्रमास पी. जे. पाटील, ए .पी .सुकरे, एस. एस. जाधव, एस. एल. मोहिते, प्रशांत सुकरे आदी उपस्थिती होती.
कराड तालुक्यात मंगळवारी ८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला असून नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयही महिला दिन साजरा झाला. या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींना सँनिटरी पँडचे वितरण करण्यात आले. दिवंगत सिंधुताई सुकरे यांच्या स्मृतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी डॉ. शुभांगी माळी म्हणाल्या, मुलींमध्ये व्यायामला महत्व फार दिले जात नाही. पण आता मुलींनी सुरूवातीपासूनच व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे. तसेच त्यांनी स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व देण्याचे आवश्यकता असल्याचे सांगितले.