मुंबई : महान्यूज लाईव्ह
आज ( ता. ८ मार्च ) आयकर विभागाने युवासेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी संस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकला. राहुल कनाल हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने हा छापा शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय कदम यांच्या घरावरही छापा पडला आहे. संजय कदम हे राज्याचे मंत्री अनील परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय कदमाचे अनील परब यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी असल्याचीही माहिती आहे.
यासोबतच उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या बहिणींच्या घरावरही छापे टाकले असल्याची माहिती पुढे येत आहे.
या धाडींबाबत प्रतिक्रिया देताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे दिल्लीचे आक्रमण असल्याची टिका केली.
महाराष्ट्रात ४० ठिकाणी धाडसत्र सुरु आहे. यामध्ये बंगळूरध्येही आयकर विभागाने छापे घातले आहेत. यामध्ये २५ घरांवर छापे मारले गेले असल्याची माहिती आहे.
आज ४ वाजता संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच हे छापे पडले आहेत.